राज्यात अवकाळी पावसाची शक्यता

0

    लोकशाही, न्यूज नेटवर्क

 

तापमानात सातत्याने चढउतार होत आहे. त्यामुळे दिवसा उन्हाळा आणि रात्री जोरदार थंडी पडल्याचं दिसून येत आहे. वातावरणात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे राज्यात पावसाचे वातावरण निर्माण झाले आहेत. दरम्यान, राज्यात आजपासून पुन्हा एकदा अवकाळी पाऊस (Unseasonal rain) होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मागील आठवडाभरापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात गारपीटीसह अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अवकाळीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. ऐन रब्बी हंगामातील पिके मातीत गेल्याने बळीराजाला (Farmer) अश्रू अनावर झाले. सरकारने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

 

 आजपासून पावसाची शक्यता

राज्यात आजपासूनडा मराठवाडा (Marathwada), उत्तर मध्य महाराष्ट्र (North Madhya Maharashtra), धुळे (Dhule), नाशिक (Nashik), नंदुरबार (Nandurbar) यासह विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. याचबरोबर सोलापूर जिल्ह्यासह विदर्भावर अधिक परिणाम होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर राज्यातील काही जिल्ह्यात वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पडतोय अवकाळी पाऊस?

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्या असल्याने राज्यात अवकाळी पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दक्षिण छत्तीसगडपर्यंत समुद्रसपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच वाऱ्यांचे प्रवाह देखील खंडित झाल्याने पावसाला पोषक हवामान होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.