हृदयद्रावक; बारागाड्यांच्या खाली येऊन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

मंगळवारी एरंडोल तालुक्यातील तळई येथे (At Talai in Erandole Taluk) चंपाषष्ठी निमित्त बारागाडे ओढण्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ग्रामस्थांची व भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. यावेळी बारा गाड्यांजवळून गर्दीत पळताना एका तरुणाचा पायात पाय अडकल्याने तो बारागाड्यांच्या खाली आला. या घटनेत त्याच्या पोटावरून बैलगाडीचे चाक गेल्याने राहुल गंभीररित्या जखमी झाला होता. मात्र रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला आहे.

एरंडोल तालुक्यातील तळई गावात हि धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता घडली. या तरूणाचा जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना रात्री अडीच वाजता मृत्यू झाला आहे. राहूल पंडीत पाटील (३०), रा. तळई ता. एरंडोल असं मृत तरुणाचे नाव आहे.

दरम्यान आज बुधवारी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (District Government Medical Colleges) शवविच्छेदन (Autopsy) करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोलीस नाईक ललित भदाणे करत आहेत. दरम्यान, राहूल पाटील हा दीड वर्षापूर्वीच एरंडोल तालुक्यातील निपाणे येथील जिल्हा बँकेच्या शाखेत लिपिक म्हणून नोकरीला लागला होता. त्याला दहा महिन्यांचा रुद्र नावाचा मुलगा देखील आहे. राहुलच्या पश्चात वडील पंडित मिठाराम पाटील, आई सरला, पत्नी अश्विनी व लहान भाऊ महेंद्र असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.