पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ११ डिसेंबर रोजी महाराष्ट्र दौरा…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

नागपूर मेट्रो आणि समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर रोजी होणार असून त्यासाठी ते नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. हा प्रकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वकांशी प्रकल्प मानला जात आहे.

दरम्यान, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहणार आहेत. तसेच पंतप्रधान मोदी नागपूर दौऱ्यावर येत असल्याने राज्यासह भाजपमधील नेत्यांच्या नजरा या कार्यक्रमाकडे लागून राहिल्या आहेत.

नागपूर मेट्रो आणि समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण झाले असून या दोन्ही कामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी नागपूरमध्ये येत आहेत. यासाठी समृद्धी महामार्गाच्या प्रशासनाकडून १० ते १५ हजार लोक बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तर बांधकाम कंपनीकडून समृद्धी महामार्गाच्या सर्व टोलचे हस्तांतरण पूर्ण करण्यात आले असून वायफळ टोलप्लाझा येथे लोकार्पण सोहळा होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.