दृश्यम-२ स्टाइल खुन; पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या…

0

 

बेंगळुरु, लोकशाही न्यूज नेटवर्क:

चित्रपटाच्या कथेला साजेशी हत्या आणि त्यानंतरचे नाट्य बेंगळुरु मध्ये उघडकीस आले आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या दृश्यम २ या कथानकावर आधारित हा खून उघडकीस आला आले. अगदी चित्रपटात दाखवल्या प्रमाणे पुरावे नष्ट करण्याचा थरार यात आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली. बेंगळुरुतील सोलादेवनहल्ली इथं पुरावे नष्ट केले. या प्रकरणाचा तपास करणारे पोलीसही चक्रावले. पोलिसांनी तपासात खूनाच्या प्रकरणाचे गूढ उकलले आहे. जयलक्ष्मीने प्रियकरासमोबत मिळून पती देसगौडाचा गळा आवळला. त्यानतंर खूनासाठी वापरलेलं साहित्य वेगवेगळ्या ठिकाणी फेकून देत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

जयलक्ष्मी आणि देसगौडा यांचे लग्न १६ वर्षांपूर्वी झाले होते. त्यांना दोन अपत्येसुद्धा आहेत. मात्र पती-पत्नीमध्ये नेहमीच भांडण होत होते. जयलक्ष्मीचे एका पुरुषासोबत अनैतिक संबंध होते. तिचा पती देसगौंडा घरी नसताना तो घरी येत-जात असे. देसगौंडाला त्याच्या पत्नीवर अनैतिक संबंधावरून संशय होता. यावरूनच रविवारी रात्री उशिरा देसगौंडाचा पत्नीसोबत वाद झाला. यावेळी पत्नीने देसगौंडा तिच्या प्रियकराला सुनावत असल्याचं ऐकलं. यावेळी तो प्रेमी घराच्या मागच्या दरवाजातून आत आला आणि दोरीने देसगौंडाचा गळा आवळून हत्या केली.

देसगौंडाचा मृतदेह सोलादेवनहल्ली फार्म हाऊसमध्ये एका कारमधून नेण्यात आला. त्याला म्हैसूर-बेंगलुरु महामार्गावर एका पुलावरून फेकून दिलं होतं. मृतदेहापासून ५०० मीटर अंतरावर मोबाईल फेकून दिला होता. त्यानतंर गळा आवळण्यासाठी आणि हत्येसाठी वापरलेली दोरी इतरत्र फेकली होती. वेगवेगळ्या जागी हे साहित्य फेकून पुरावे मिळू नयेत यासाठी आरोपींनी प्रयत्न केले. तसंच मृतदेह टाकल्यानंतर कार आरोपी घेऊन गेले.

आरोपी बीई ग्रॅज्युएट असून व्यवसायाने इंजिनिअर आहे. जयलक्ष्मीसोबत त्याचे अनेक वर्षे अनैतिक संबंध होते. देसगौंडाच्या नातेवाईकांनी २७ नोव्हेंबरला तो सोमशेतल्लीहून बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दिली होती. बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद झाल्यानतंर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यानतंर देसगौंडाचा मृतदेह रामनगर जिल्ह्यातील केम्पेगौंडा डोड्डीजवळ मिळाला होता.

पोलिसांनी चौकशी करताना प्रियकराने जयलक्ष्मी मोठी बहीण असल्याचं सांगितलं. संशयित म्हणून दोघांना ताब्यात घेण्यात आलं होतं. मोबाईल सीडीआर पडताळणी केल्यानतंर त्याला जयलक्ष्मीने कॉल केल्याचं समोर आलं होतं. मोबाईल कॉलच्या आधारे पोलिसांनी दोघांना अटक केली असून आता अधिक तपास केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.