उद्धव ठाकरे गट ? – एकनाथ शिंदे

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;

शिवसेना कुणाची हा प्रश्न अद्याप कायम आहे. शिंदे गटाकडून शिवसेना आमचीच असल्याचा वारंवार दावा केला जात आहे. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा उल्लेख ‘उद्धव ठाकरे गट’ असा केला आहे.

राज्यात काही ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कार्यकर्त्यांचे आणि मतदारांचे आभार मानले. ट्वीटमध्ये त्यांनी एक पोस्टर शेअर केलं आहे. यात कोणत्या पक्षाला किती यश मिळालं याची आकडेवारी त्यांनी दिली. यात त्यांनी ‘उद्धव ठाकरे गट’ असा उल्लेख केला आहे.

एकनाथ शिंदे ट्वीटमध्ये म्हटलं की, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती सरकारला जनतेचा कौल मिळाला आहे. शिवसेना-भाजपा युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन. तसेच निवडणुकीत मेहनत घेतलेल्या सर्व शिवसेना-भाजपा युतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारराजाचेही अभिनंदन व आभार.

Leave A Reply

Your email address will not be published.