बाबुरावच्या चड्डीची किंमत ऐकून उतरेल पॅंट…!

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

सध्या ट्रेंड आहे तो घरात आरामात बसून एका क्लिकवर सारं काही मागवण्याचा, त्यात विविध प्रकारची ऑफर्स मुले तर हा मोह काही केल्या आवरत नाही. विशेष करून तरुणवर्ग तर याकडे फार आकर्षित असतो. एकीकडे ही स्थिती असताना, दुसरीकडे काही जणांना स्थानिक बाजारात (Local Market) जाऊन खरेदी करायला आवडतं. काही जणांना कपड्यांची (Cloths) खूप हौस असते. आपल्या आवडत्या कपड्यांसाठी असे लोक हवी ती किंमत मोजायला तयार असतात. सध्या इंटरनेटवर एका प्रकारच्या शॉर्ट्सची (Shorts) म्हणजेच चड्ड्यांची जोरदार चर्चा आहे. ही चड्डी ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध असून, तिची किंमत चक्क 15 हजार रुपये आहे. अत्यंत उपयुक्त आणि आरामदायी असलेल्या या शॉर्ट्सचं बॉलिवूडशी (Bollywood) खास कनेक्शन आहे.

`हेराफेरी` या गाजलेल्या हिंदी चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) यांनी खास भूमिका साकारली होती. परेश रावल यांनी साकारलेली बाबूराव (Baburao) ही भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहे. या चित्रपटात परेश रावल यांनी परिधान केलेली पट्ट्यांची चड्डी विनोदाचा विषय ठरली होती. सध्या या शॉर्ट्ससारखी दिसणारी अंडरगारमेंट ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहे. या अंडरगारमेंटची किंमत 15 हजार रुपये आहे. ट्विटरवर @vettichennaiguy नावाच्या अकाउंटवरून या शॉर्ट्सच्या विक्रीचा तपशील शेअर करण्यात आला आहे. यावर शेकडो जणांनी मजेदार प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

https://twitter.com/vettichennaiguy/status/1553280018876342274?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1553280018876342274%7Ctwgr%5E217ddc3ef56072c3263e9b973dcab05f0b361e08%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Flokmat.news18.com%2Fviral%2Fbaburao-ka-kachcha-on-sale-at-online-shopping-website-users-shocked-after-reading-price-gh-mhcp-741636.html

Leave A Reply

Your email address will not be published.