उत्तम आरोग्यासाठी ‘उणोदरी’ स्वीकारा – पु. पार्श्वचंद्रजी म.सा.

0

प्रवचन सारांश – दि. 6 ऑगस्ट 2022

या जगातला प्रत्येक जीव जगण्याची अभिलाषा बाळगून असतो. मृत्यू कोणालाच आवडत नाही. सगळ्यांना जगणे आवडत असते. मानव व इतर प्राणी सुखाची लालसा बाळगून असतात. ‘मी सुखी बनेल.’ व ‘मी सुखी राहील.’ ह्या दोन गोष्टी मोलाच्या ठरतात. सुखी राहण्यासाठी प्रत्येक जीव आयुष्यभर झटत असतो. प्रत्येक जीव सुखाच्या मागे धावत असतो. भगवद्गीतेमध्ये 18 व्या अध्यायात श्रीकृष्णाने अर्जुनाला तीन प्रकारचे सुख सांगितलेले आहेत. भगवान महावीर यांनी तर सुखाचे 10 प्रकार सांगितले आहेत. याबाबत आजच्या प्रवचनात पु. जयेंद्रमुनी यांनी सांगितले. जयगच्छाधिपती 12 वे पट्टधर पार्शचंद्रजी म.सा. यांचे खास प्रवचन देखील झाले. जळगाव येथील स्वाध्याय भवन येथे पु. पार्श्वचंद्रजी म.सा. अनुप्पेहा ध्यानप्रणेता डॉ. पदमचंद्र म.सा. आदीठाणा 7 यांच्या पवित्र सानिध्यात चातुर्मास कार्यक्रम सुरू आहे. पार्श्वचंद्रजी म. सा. यांनी श्रावक-श्राविकांना आपल्या प्रवचनातून मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, अलीकडे आपण सर्व ज्या वाईट, चुकीच्या गोष्टी आहेत त्या स्वीकारण्याकडे अधिक कल असतो. जीभेचे चोचले पुरवण्यात नको ते खाल्ले जाते. त्यामुळे पोट बिघडते. थोडासा ताप आला किंवा तब्येत बिघडली तर आपण अस्वस्थ होत असतो. लगेच डॉक्टरकडे जातो. दैनंदिन जीवन जगण्यासाठी आगमशास्त्रामध्ये काही मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. ‘उणोदरी’ ही संकल्पना सांगितलेली आहे. आपलं पोट जितक्या अन्नाने भरते त्यापेक्षा कमी भोजन करणे म्हणजे ‘उणोदरी’ होय. या विश्वामध्ये जापानी लोकांचे आयुर्मान जास्त असते. 100 वर्षाहून अधिक काळ ते जगतात. त्यांच्या दीर्घ आयुष्याचे रहस्य जाणून घेण्यासाठी एक सर्वेक्षण करण्यात आले. त्या सर्वेक्षणात जापानी लोक जेवढे अन्न पोट भरण्यासाठी लागते त्याहून कमी अन्न ते खातात. जो जास्त खातो तो अल्पायुषी ठरतो… त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी उणोदरी स्विकारायला हवी असे पु. पार्श्वचंद्रजी म.सा. यांनी सांगितले.

जीवन जगत असताना छोट्या छोट्या गोष्टीतून आपण कशाय चिटकवून घेत असतो. ‘तुम्ही मोबाईल वापरता, त्याचा फायदा तुम्हाला किती होतो? ते तुम्हालाच ठाऊक.’ पितळी भांड्यांमध्ये जर लोणचे बराच वेळ ठेवले तर त्याचा रासायनिक परिणाम होतो. ते खाण्यात आले तर त्याचा दुष्परिणाम शरीरावर होत असतो. या सगळ्या गोष्टींकडे श्रावण-श्राविकांनी अवश्य भान ठेवले पाहिजे. आगम ग्रंथात जे सांगण्यात आले आहे त्यावर अवलंब करावा असे आवाहन प.पू. पार्श्वचंद्रजी म.सा. यांनी प्रवचनात केले. रविवारी 7 ऑगस्ट रोजी सकाळी 9.00 ते 10.30 दरम्यान “घरेलू हिंसा व विवेक” या विषयावर डॉ. पदमचंद्रमुनी यांचे विशेष प्रवचन होणार आहे. सोमवारी दि. 8 ऑगस्ट रोजी आचार्यसम्राट शुभचंद्रजी म.सा. यांची जन्म जयंती साजरी होणार आहे. श्रावणकांनी स्वाध्याय भवन येथे उपस्थित रहावे असे आवाहन देखील करण्यात आले.

—– ¤¤——

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर….

Leave A Reply

Your email address will not be published.