७ वर्षाचा मुलगा करतोय डिलेव्हरी बॉयचे काम ? (व्हिडीओ)

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;

शाळेत जाण्याच्या, खेळण्याबागडण्याच्या वयात कित्येक मुलांना स्वतःची कामंही नीट करता येत नाही त्या वयात एक मुलगा डिलीव्हरी बॉय बनला आहे. सकाळी स्कूल बॅग आणि संध्याकाळी झोमॅटोची बॅग खांद्यावर घेतो. सकाळी शाळेत जाऊन संध्याकाळी हा मुलगा फूड डिलीव्हरी करतो. इतक्या कमी वयात हा मुलगा डिलीव्हरी बॉय का बनला याचं कारण समजलं तर तुम्ही भावुक व्हाल. तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. ज्या मुलाने खाण्यासाठी हट्ट करायला हवा तो मुलगा लोकांच्या घरोघरी खाणं पोहोचवतो आहे. राहुल मित्तर नावाच्या ट्विटर युझरने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

https://twitter.com/therahulmittal/status/1554154403426635776?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1554154403426635776%7Ctwgr%5Edff8b89d47e8c31c6edb45fc1956f4f5244dc022%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Flokmat.news18.com%2Fviral%2F7-year-old-zomato-delivey-boy-delivered-food-after-father-accident-emotional-video-viral-mhpl-741647.html

व्हिडीओत पाहू शकता एक लहान ७ वर्षाचा मुलगा हातात चॉकलेटचा बॉक्स घेऊन दिसतो आहे. हा मुलगा नेमकं असं का करत आहे, याचं कारणही या व्हिडीओ त्याला विचारण्यात आलं. तेव्हा एका अपघातात वडिलांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्या जागी तो काम करत असल्याचं तो सांगत आहे. इतक्या कमी वयात संकटकाळात आपल्या कुटुंबाचा भार आपल्या छोट्याशा खांद्यावर घेणाऱ्या या मुलाचं अनेकांनी कौतुक केलं आहे. काहींनी त्याला मदतीचा हातही पुढे केला आहे.

काहींनी इतक्या वयात काम करायला लावल्याने आक्षेप घेतला आहे. अशा ट्विटला प्रतिक्रिया देताना राहुल यांनी झोमॅटोने या मुलाच्या वडिलांचं अकाऊंट तात्पुरत्या स्वरूपात बंद केलं आहे आणि त्यांना आर्थिक मदत दिली आहे. त्याचे वडील बरे झाल्यानंतर त्यांचं अकाऊंट सुरू करणार आहे, अशी माहिती दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.