उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

 

जळगाव (Jalgaon) जिल्यातील पाचोरा याठिकाणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सभा घेण्यात आली, त्यावेळेची त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) घणाघाती टीका केली. घराणेशाहीवर तुम्ही बोलता. मी फकीर आहे, असे सांगता. तुमच्या मागे पुढे कोणी नाही. कधीतरी झोळी लटकवून निघून जाल, माझ्या जनतेच्या हाती कटोरा द्याल. म्हणूनच चांगले घराणे लागते, असा टोला ठाकरे यांनी मोदींना लगावला होता.

 

सोबतच उद्धव ठाकरेंना उत्तर देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Chief Minister Eknath Shinde) त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. माध्यमांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगात त्यांचे नेतृत्व सिद्ध केले आहे. त्यांनी देशाची अर्थव्यवस्था मोठ्या उंचीवर नेली आहे. आपल्याला जी20 परिषदेचे अध्यक्षपद मिळाले. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केला, त्याचा निषेध करावा तितका कमी आहे. उद्धव ठाकरेंचे वक्तव्य हे वैयक्तिक द्वेशातून आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.