वाढत्या तापमानाने केळीबागा सुकण्याच्या मार्गावर

0

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क

 

मनवेल (Manavel) सह परिसरात सूर्य आग ओकू लागल्याने शेतकरी राज्याने दिवसरात्र जिवापार जतन केलेली केळी बागा सुकण्याच्या मार्गावर असल्याने भविष्यातील शेतकऱ्यांची गणित अंधारमय होणार काय? असाच प्रश्न दिसत असून वाढत्या तापमानाने रुग्णांच्या संकेत देखील वाढ होत असल्याचे दिसते. गेल्या पंधरा वीस दिवसांपासून तापमानाचा पारा वाढत असून या वाढत्या तापमानामुळे अबाल वृद्धांसह लहान बालकांची लाही-लाही होत आहे. त्यातच थोडय़ाफार प्रमाणावर उभ्या असलेल्या केळि बागा वाढत्या तापमानामुळे सुकण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी चिंतातूर दिसत असून या बागांकडे पाहिल्यावर शेतकर्यांची अवस्था बिकट होत आहे.

पाण्याच्या पातळीत घट- संपूर्ण एप्रिल महिन्यातील वाढत्या तापमानाची तीव्रता पाहता तापमानात वाढ झाल्याने हिरवेगार दिसणारे केळि बागा कोरडे होण्याच्या मार्गावर आहे यातच पाण्याची पातळी सतत खालावत असल्याने व भारनियमनाच्या दणक्याने केळि बागांना जेमतेम पाणी दिले जात असल्याने मे अखेरपर्यंत केळि बाग टिकतील का? अशा प्रश्नाने शेतकरी चिंतीत आहे तर पाणीपातळी खालावत असून त्यातच भारनियमनामुळे बागांना पाणी टंचाई जाणवत आहे .

भारनियमनाचा फटका- सध्या मनवेल सह परिसरात सोळा सतरा तासाचे भारनियम सुरु आहे काही फिडरवर फक्त दिवसाच वीजपुरवठा सुरू असतो त्यामुळे आधीच वाढते तापमान त्यात वाढत्या तापमानामुळे ठिबक सिंचनाच्या नळ्या अधिक तापलेल्या असतात त्यामुळे दिवसा वीजपुरवठा सुरू असल्याने नळ्यांद्वारे दिले जाणारे पाणी अतिशय गरम असल्याने वाढते तापमानात त्या बागांना दिवसा दिले जाणारे गरम पाणी मुळे केळीबागा उद्धवस्त होण्याच्या मार्गावर असून शेतीसाठी दिवसा रात्रीचे भारनियमन करण्यात यावे अशी मागणी तापमानाने होरपळलेल्या शेतकऱ्यांकडून होताना दिसते.कारण जेणेकरून रात्री केळीबागांचे पाणी मिळाल्यास गारवा निर्माण होऊन केळी बागा जगू शकतील.

तापमानाचा वाढता पारा मनवेल सह परिसरात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वेगाने चढत असल्याने मे महिन्यासारखा उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून मनवेलसह परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. सकाळी दहा वाजेपासुनच रस्त्यावरची वर्दळ कमी – कमी होऊन रस्ते ओस पडत आहेत. मे महिना लागला की शेतकऱ्यांची शेती कामांना सुरुवात होते. पण एप्रिल महिन्यातच एवढे कडक ऊणामुळे तापमानात भर पडत आहेत तर मे महिन्याचे काय? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. भारनियमनामुळे दुपारी विजेवर चालणारे पंखे, फ्रीज, कुलर शोपीस म्हणून घरात दिसत असून डोक्यावर कर्जाचा डोंगर, सूर्याचे वाढत असलेले अग्नीतांडव, सतत खालावत जाणारी पाण्याची पातळी आणि भारनियमनाचा फटका यामुळे शेतकरी पूर्ण अडकला असून केळी बागा जगून कर्ज फिटणार का वाढणार? याच चिंतेत शेतकरी राजा दिसत आहे.

केळी भावातही फटका- सध्या केळीचे भाव स्थिर असले तरी केळी कापणी मध्ये व्यापारी बोर्ड भावापेक्षा दोनशे ते तीनशे रुपये कमी दराने केळीची मागणी करत असल्याने एकप्रकारे शेतकऱयांचे कंबरडेच मोडले जात आहे.रात्रंदिवस एक करून केळी बागांना शेतकरी पाणी देऊन बागा वाचवत असून देखील भाव फारकामुळे सुद्धा शेतकऱ्यांना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे एकीकडे वाढत्या तापमानाचा फटका, घटत असलेली पाण्याची पातळी, त्याचबरोबर शासनाचे वेळकाढू कर्जमाफीचे धोरण यामुळे शेतकरी पुरता बुडाला असून शेतकऱयांचे जगणे मुश्किल होत आहे.

अद्याप एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा चालू असुन त्यात दिवसेंदिवस तापमानात होणारी वाढ आणी ह्या वाढीचा फटका शेती शिवारातील केळी बागासह इतर पिकाना देखील बसत आहे, तर बळीराजा ह्या उन्हांपासुन पिकाच्या सरक्षणांकरिता मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करित आहेत. तर गेल्या दोन वर्षांपासुन पाऊसाने पाठ फिरवल्याने नदी, नाले, कोरडेठाक असुन त्याचा परिणाम शेती शिवारातील कुपनालिका, विहिरींच्या पाणी पातळी वर झालेला दिसुन येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.