‘हेराफेरी 3’ पुन्हा सापडला वादाच्या भोवऱ्यात, वाचा सविस्तर

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

 

‘हेराफेरी 3’ (Hera Pheri 3) या कॉमेडी सिनेमाला घेऊन मोठी नवी अपडेट समोर येत आहे. आता म्हणे सिनेमाविषयी एक मोठा वाद उभा राहिला आहे. हा वाद ‘हेराफेरी 3’ च्या मेकिंग राइ्टस संदर्भातला आहे. इरॉस इंटरनॅशनलने (Eros International) सिनेमाच्या विरोधात एक कायदेशीर नोटीस जारी केली आहे. त्याचं झालं असं की, इरॉस इंटरनॅशनलनं सिनेमाच्या निर्मात्यांना एक कायदेशीर नोटीस पाठवली आहे. यामध्ये दावा केला आहे की सिनेमाचे सर्व राइट्स हे अजूनही इरॉस इंटरनॅशनलजवळ आहेत. याआधी देखील ‘हेराफेरी 3’ संदर्भात मोठा वाद रंगला होता. टीसीरिज (T-series) क़डून सिनेमाला नोटीस जारी केलं गेलं होतं.

इरॉस इंटरनॅशनकडून जे नोटीस जारी केलं गेलं आहे त्यात नाडियादवाला ग्रुपनं अद्याप त्यांना 60 करोड रुपये देणं बाकी आहे. त्यांनी लिहिलं आहे की,”नाडियादवाला ग्रुपकडून यासंदर्भात शाश्वती दिली गेली होती की जोपर्यंत हे पैसे दिले जाणार नाहीत तोपर्यंत हेराफेरी 3 चे राइट्ल इरॉसकडेच राहतील”. Complete Cinema Magazine मध्ये पब्लिश झालेल्या नोटीसीच्या मते, फिरोज नाडियादवाला ग्रुपला हेराफेरी 3 संदर्भात इरॉस इंटरनॅशनल कडून कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.