पनीरचे सेवन करताय? मग एकदा वाचाच

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

 

पनीर (Paneer) आरोग्याला लाभदायक पदार्थ समजला जातो. जे व्हेजिटेरियन आहेत ते पनीर भरपूर प्रमाणात सेवन करत असतात. यामध्ये भरपूर प्रथिने आढळतात. याशिवाय पनीरमध्ये कॅल्शिअम (calcium), फॉस्फरस (Phosphorus), सेलेनियम फायबर (Selenium fiber) आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात, जे हाडे मजबूत करण्याचे काम करतात. याशिवाय इतरही अनेक फायदे आहेत. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की इतके फायदे असूनही पनीर शरीराला हानी पोहोचवू शकते. पनीर खाण्याचे काही तोटेही असतात. ते कोणते हेही जाणून घेऊ.

पनीर खाण्याचे तोटे

१-जे लोक लॅक्टोज इनटॉलरन्ट आहेत, त्यांना पनीरचे सेवन केल्यामुळे ॲलर्जी होऊ शकते. पनीरमध्ये लॅक्टोस कमी प्रमाणात असले तरीही सावधगिरी म्हणून त्याचे कमी प्रमाणातच सेवन करावे.

२-पनीरचे जास्त प्रमाणात सेवन केल्आस तुमचे वजन वाढू शकते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर आहारातून पनीर दूर ठेवावे.

३-जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशरची समस्या असेल तर पनीरचे जास्त सेवन करू नका, कारण त्याच्या सेवनामुळे तुमची बीपीची समस्या अधिक वाढू शकते.

४- पनीर बनवण्यासाठी वापरण्यात येणारे दूध पाश्चराइज्ड नसल्यास किंवा पनीर कच्चे खाल्ल्यास बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते.

Leave A Reply

Your email address will not be published.