अभिमानास्पद; आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे शुक्रवारी मॉरिशसमध्ये होईल लोकार्पण

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

 

आज छत्रपती शिवाजी महाराजांच (Chhatrapati Shivaji Maharaj) नाव घेतल्यावर छाती अभिमानाने फुलून येते. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे येत्या शुक्रवारी २८ एप्रिल रोजी मॉरिशसमध्ये (Mauritius) लोकार्पण होईल. मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद्रकुमार जगन्नाथ (Pravindra Kumar Jagannath) आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून संपूर्ण देशासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण असणार आहे.

मॉरिशसमध्ये सुमारे ७५ हजार मराठी बांधव असून ते पुणे, सातारा, रत्नागिरी आणि कोकण भागातून आहेत. त्यांनी आपल्या मराठी परंपरा, संस्कृती जोपासली आहे. या मराठी बांधवांच्या सुमारे ५४ संघटना असून या सर्व संघटनांचा मिळून मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन स्थापन करण्यात आला आहे. या फेडरेशनची स्थापना १ मे १९६० रोजीच झाली. शिवजयंती, महाराष्ट्र दिन, गुढीपाडवा, गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात येथे साजरे होतात. येथे एक महाराष्ट्र भवन सुद्धा उभारण्यात आले असून त्याच्या विस्तारासंदर्भातील सुद्धा काही मागण्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.