रायगडमधील आरसीएफ प्लांटच्या एसी कॉम्प्रेसरच्या स्फोटात तिघांचा मृत्यू

0

 

रायगड, लोकशाही न्यूज नेटवर्क:

रायगड जिल्ह्यात असलेल्या आरसीएफ कंपनीच्या कंट्रोल रूममधील एसीच्या कॉम्प्रेसरमध्ये मोठा स्फोट झाला आहे. प्लांटमधील एअर कंडिशनर कॉम्प्रेसरचा अचानक स्फोट झाल्याच्या या अपघातात तेथे काम करणाऱ्या तीन कामगारांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरसीएफ कंपनीच्या नियंत्रण कक्षात वातानुकूलित यंत्रणा बसविण्याचे काम सुरू होते. दरम्यान, कॉम्प्रेसरचा स्फोट झाला. दरम्यान व्यवस्थापनाने कंपनीच्या प्लांटमध्ये गळती झाल्याचा इन्कार केला असून प्लांट व्यवस्थित सुरू असल्याचा दावा केला आहे. पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून मदत आणि बचाव कार्य तीव्र करण्यात आले आहे.

रायगड पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईपासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेल्या अलिबाग येथे काही गवंडी आरसीएफ प्लांटचा एसी दुरुस्त करत असताना सायंकाळी 4:45 च्या सुमारास एसी कॉम्प्रेसरचा स्फोट झाला.

रायगड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे म्हणाले, या घटनेत तीन मजुरांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. पुढील तपास सुरू असून अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.