बलात्काराचा दोषी गुरमीत राम रहीमच्या सत्संगाला भाजपचे अनेक नेते…

0

 

हरियाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

बलात्कार आणि हत्येप्रकरणी 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या धार्मिक नेते गुरमीत राम रहीम सिंग यांनी बुधवारी एका वर्चुअल सत्संग कार्यक्रमाचे आयोजन केले होते ज्यात हरियाणाच्या कर्नालच्या महापौरांसह अनेक राजकारणी आणि सत्ताधारी भाजपच्या अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती.

डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीमला 2017 मध्ये दोषी ठरवण्यात आले होते. त्याच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या अर्जानंतर त्याला गेल्या आठवड्यात ४० दिवसांसाठी पॅरोल मंजूर करण्यात आला होता. त्यांनी उत्तर प्रदेशातील बागपत येथून सत्संगाचे आयोजन केले होते.

यापूर्वी जूनमध्ये डेरा प्रमुख महिनाभराच्या पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आला होता. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये तीन आठवड्यांची सुटी देण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.