२०० फूट खोल दरीत कार कोसळली; तिघांचा मृत्यू…

0

 

वाशीम, लोकशाही न्यूज नेटवर्क;

वाशीम जिल्ह्यातील काही युवक कोकण पर्यटनासाठी गेले असता. परतीच्या वाटेवर असताना माणगाव पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात कारचा अपघात झाला. २०० फूट खोल दरीत कार कोसळली. त्यात तीन जण मृत झाले असून, तिघे गंभीर असल्याचे वृत्त आहे. यामध्ये गाडीचा अक्षरशः चुराडा झाला.

सविस्तर वृत्त असे की, ताम्हिणी घाटात कारचा अपघात होऊन कार २०० फूट खोल दरीत कोसळली. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तीनजण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी २० ऑगस्ट रोजी  सायंकाळी घडली. मृत तिन्ही प्रवासी वाशीम जिल्ह्यातील आहेत. जखमींवर माणगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

ऋषभ चव्हाण, सौरभ हिंगे, कृष्णा राठोड हे मृतांचे नाव आहेत, सर्व मृतक वाशीम जिल्ह्यातील आहेत. रोशन गाडे, प्रवीण सरकटे व रोशन चव्हाण हे गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांच्यावर माणगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.