तिजोरी चोरांना २४ तासात अटक…

0

 

दोंडाईचा, लोकशाही न्यूज नेटवर्क; 

शहरात थेट तीन फुटांची लोखंडी तिजोरीच पळविणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी 24 तासातच अटक केली आहे. वरवाडे भागात ही चोरी झाली होती. यात दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने पोलिसांना मिळाले आहेत. वरवाडे परिसरातील भतवाल टाकी रस्त्यावर कैलास हिरालाल भावसार यांच्याकडे चोरट्यांनी काल घरफोडी केली होती.

याप्रकरणी दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक दूर्गेश तिवारी यांनी लागलीच गुन्ह्याच्या तपासासाठी पथक तयार केले. उपनिरीक्षक दिनेश मोरे, हेड कॉन्स्टेबल संदीप कदम, पोलीस नाईक योगेश पाटील, हिरालाल सुर्यवंशी, अनील धनगर यांच्या पथकाने माहिती काढली. हा गुन्हा शहरातील सराईत गुन्हेगार नुऱ्या व कौसर यांनी केल्याची प्रथमदर्शनी माहिती मिळाली.

संबंधित गुन्ह्या बाबत त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीला गेलेल्य तिजोरीसह रोकड व सोन्या-चांदीच्या दागिने देखील प्राप्त झाले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, शिरपूर उपविभागीय अधिकारी दिनेश आहेर यांच्या सुचनेनुसार पोलिस निरिक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गर्शनाखाली करण्यात आली.

कुटुंबीय मागच्या खोलीत झोपलेले असताना चोरट्यांनी पुढील किराणा दुकानाच्या दरवाजातून आत प्रवेश करत तीन ते साडेतीन फुटांची लोखंडी तिजोरीत चोरून नेली. त्यात सोने चांदीचे दागिने व दहा हजारांची रोकड होती. या गुन्ह्याचा छडा पोलीसांनी २४ तासातच लावला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.