शकुंतला जे.माध्यमिक विद्यालयात इंटरॅक्ट क्लबची स्थापना…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; 

शकुंतला जे.माध्यमिक विद्यालयात 29/08/2022 राेजी राेटरी क्लब अंतर्गत इंटरॅक्ट क्लबची स्थापना करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांचा पदग्रहण समारंभ कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.आर.एन.महाजन या होत्या. कार्यक्रमाची सुरूवात ईशस्तन व स्वागत गीताने झाली, कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. राजेश वेद, इंटरॅक्ट कमिटी चेरमन रो.पंकज व्यवहारे, रो. सुभाष अमळनेरकर, माजी अध्यक्ष रो. कॅप्टन मोहन कुलकर्णी, रो. मकरंद डबीर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ए.ए. सुरवळकर यांनी केले.

याप्रसंगी रोटरी क्लबचे राजेश वेद यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर इंटरॅक्ट कमिटी चेरमन पंकज व्यवहारे यांनी प्रस्तावनेत इंटरॅक्ट क्लब विषयी माहिती दिली. मुख्याध्यापकांनी अध्यक्षीय भाषणात उपक्रमांविषयी मार्गदर्शन केले. इंटरॅक्ट क्लबचे समन्वयक यु.के.भोळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.