पतीने संशय घेतला; पत्नीने काटा काढला…

0

 

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

सतत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन वाईट बोलत असल्याचा राग अनावर झाल्याने पतीच्या डोक्यात व डोळ्यावर विळ्याने वार करून पत्नीने पतीला ठार केल्याची घटना दि ११ रविवार रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास करंजी पाचदेवळी येथे घडली आहे. सदर आरोपी पत्नीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या बाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील करंजी पाचदेवळी येथील  मयत दगडू पुंडलिक सुरवाडे (४५) हे आरोपी पत्नी आशाबाई दगडू सुरवाडे (३८) आपल्या दोन मूली एका मुला सोबत वास्तव्यास होते. ते सतत दारूच्या नशेत पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेऊन वाईट बोलत असत दि ११ रविवारी सायंकाळी कामावरून दारुच्या नशेत घरी आले व घरातील खाटेवर बसुन पत्नीस तुझे पर पुरुषाशी संबंध आहेत असे बोलू लागला, या गोष्टीचा राग अशाबाई दगडू सुरवाडे हिला अणावर झाल्याने घरातील लोखंडी विळ्याने पती दगडू सुरवाडे यांच्या डोक्यात सपासप वार करण्यास सुरुवात केली, तेवढ्यात घरा शेजारी शेकोटीवर बसलेली मोठी मूलगी रोशनी ही जेवणासाठी घरात जाताच तिला आवाज आला, तीने दरवाजा ढकलून पहिले तर आई आपल्या वडिलांच्या डोक्यात विळ्याने वार करीत होती. तिने लागलीच हातातून विळा हिसकावत बाबाला मारू नको असे सांगून आरडा ओरडा करीत शेजार्‍याकडे मदतीसाठी धाव घेतली. शेजारी घरा कडे येई पर्यंत पुन्हा पती जागीच ठार झाला होता.

याबात मुलगी रोशनी दगडू सुरवाडे हिच्या फिर्यादी नुसार अशाबाई दगडू सुरवाडे हिच्या विरोधात भा द वी कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून संशीयीत आरोपीस पोलीसानी ताब्यात घेतले. घटनेचा पुढील तपास सह पोलीस निरिक्षक आशिष अडसुड हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.