माहेराहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ…

0

 

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

माहेराहून व्यवसयासाठी तीन लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा छळ करणाऱ्या पाच जणांविरुद्ध पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रेणुका योगेश पाटील (२५) सुदर्शन नगर पारोळा येथील माहेर व नंदुरबार येथील सासर असलेल्या विवाहितेला पती योगेश सुदाम पाटील, रा .दत्त कॉलणी कोरीट नाका नंदुरबार याच्या सोबत विवाह झाला होता. लग्नाच्या महिनाभरानंतर पती योगेश सुदाम पाटील, सासरे सुदाम भिका पाटील, सासू प्रमिला सुदाम पाटील, ननंद रविना राकेश न्हावी, दिर विजय सुदाम पाटील यांनी विवाहितेला तुझ्या वडिलांकडून व्यवसाय करण्यासाठी ३ लाख रुपये आणावे म्हणुन सांगितले, विवाहितेने नकार दिला असता सर्व मंडळींनी शिवीगाळ व मारहाण केली तसेच मानसिक त्रास देऊन छळ केला. याप्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून वरील पाच जणांविरुद्ध पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बापुराव पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.