देवेंद्र फडणवीसांना पाठविलेल्या नोटिशींची ठाण्यात होळी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

ठाणे: महाविकास आघाडीतील पोलिसांच्या बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांची चौकशी करून कारवाई करण्यापेक्षा, श्री. फडणवीस यांनाच ठाकरे सरकारने नोटीस पाठवून दडपशाही सुरू केल्याच्या निषेधार्थ ठाणे शहर भाजपाच्या वतीने शहरातील १० ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात आले. ठाकरे सरकारला `विनाशकाले विपरीत बुद्धी’ सुचली असून, महाविकास आघाडीतील अहंकार दिसत आहे, अशी टीका करण्यात आली.

 

 

भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली कोर्ट नाका येथे मुख्य आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजपाचे प्रदेश उपाध्यक्षा माधवी नाईक, सचिव संदिप लेले, माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, नारायण पवार, सुनेश जोशी, मृणाल पेंडसे, परिवहन समितीचे सदस्य सुरेश कोलते, शहर सरचिटणीस विलास साठे, कैलास म्हात्रे, मनोहर सुखदरे, जयेंद्र कोळी, राजेश मढवी, सचिन केदारी, कृष्णा भुजबळ, युवा मोर्चाचे सारंग मेढेकर आदींनी भाग घेतला.

तर भाजपाचे माजी नगरसेवक अर्चना मणेरा, मुकेश मोकाशी, मंडल अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली  कासारवडवली, वागळे इस्टेट, पोखरण रोड नं. २, कळवा,  मुंब्रा, दिवा आदींसह १० ठिकाणी आंदोलन करून नोटिशींची होळी करण्यात आली. कासारवडवली येथील आंदोलनानंतर माजी नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या आंदोलनात मंडल अध्यक्ष हिरोज कपोते, नरेश पवार, निलेश पाटील, हेमंत म्हात्रे, संतोष जायसवाल, भूषण पाटील, सचिन पाटील, विजय रेडकर, राम ठाकूर, रोहिदास मुंडे, कुणाल पाटील, सोहेल शेख आदींनी भाग घेतला.

महाविकास आघाडी सरकारकडून देवेंद्र फडणवीसांसह भाजपा कार्यकर्त्यांवर दडपशाही सुरू आहे. ठाकरे सरकारला विनाशकाले विपरीत बुद्धी’ सुचली असून, अहंकार दिसून येत आहे. या प्रकाराबद्दल जनतेच्या भावना तीव्र असून, महाविकास आघाडी सरकारविरोधात जनमत तयार होत आहे.

ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे उद्योग झाकण्याचा प्रयत्न केला जात असतानाच, विरोधकांवर दडपशाही केली जात आहे, अशी टीका आमदार निरंजन डावखरे यांनी केली. ठाकरे सरकारने कितीही दडपशाही केली, तरी भाजपा कार्यकर्त्यांचा आवाज दाबता येणार नाही. श्री. फडणवीस यांच्या पाठीशी भाजपाचे कार्यकर्ते असून, भ्रष्टाचाराविरोधातील लढाई आणखी तीव्र केली जाईल, असे आमदार संजय केळकर यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.