पाचोरा येथे ब्राह्मण महिला मंडळातर्फे महिला सप्ताह साजरा

0

लोकशाही न्युज नेटवर्क

पाचोरा ; अखिल भारतीय ब्राह्मण महिला मंडळातर्फे ८ मार्च महिला दिनाचे औचित्य साधून महिला सप्ताह साजरा करण्याचे नियोजन केले होते. त्याचाच एक भाग म्हणून महिला मंडळातील सदस्यांनी गरीब व अबला महिलांसाठी वस्त्र दान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महिला मंडळाने अशा महिलांचा साडी चोळी देऊन सन्मान केला व महिला दिनाचे महत्व सांगितले. यावेळी पाचोरा शहरातील असंख्य महिला उपस्थित होत्या.

ब्राह्मण महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनिता तिवारी, तृप्ती नाईक, पूजा तांबोळी, सोनाली गौड, मधुरा पाठक, गौरी भट, मयुरी बिल्डीकर, क्षमा शर्मा, स्मिता सराफ, राधा शर्मा, हेमा पाटील, शर्वरी तांबोळी, आरती दायमा, कल्याणी देशपांडे, स्वाती जोशी, पूजा दिक्षित, स्वाती कुलकर्णी, दिपा जोशी, पूजा तळेगावकर, रूपाली जोशी, ज्योती चोबे, आदी महिला मंडळाच्या सदस्य उपस्थित होत्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.