यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क:
यावल शहरातून एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. शहरातील एका शिक्षकाचा विहीरीत तोल जावून पडल्याने दुदैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, यावल शहरातील वसाहतीमधील बालाजी सिटीया परिसरात राहणारे व वाघझीरा तालुका यावल येथील आदीवासी आश्रमशाळेतील शिक्षक नितिन लक्ष्मण निंबाळे (४५) हे सोमवारी २४ जुलै रोजी सायंकाळी आपल्या ठरलेल्या दिनचर्येचा भाग म्हणून फिरावयास गेले. दरम्यान\ परिसरातील बालाजी मंदीराजवळ कोरड्या विहीरीच्या ओट्यावर बसले असतांना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते विहीरीत पडले. आणि यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत मिलींद दिलीप मिस्त्री यांनी यांनी खबर दिल्याने यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे. मयत शिक्षक नितिन निंबाळे यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.