राष्ट्रीय महामार्गावर वेग मर्यादेचे फलक लावा – एकनाथराव खडसेंची मागणी…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

तरसोद-चिखली (जि.जळगाव) या चौपदरी महामार्गावर वेग मर्यादेचे फलक लावण्याबाबत व पोलिसांकडून वेगमर्यादा उल्लंघन केल्या बद्दल अवाजवी दंड आकारण्यात येत असल्याबद्दल आ.एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषद सभागृहात तारांकित प्रश्न उपस्थित केला.

यावेळी ते म्हणाले, जळगाव जिल्हयात राष्ट्रीय महामार्ग वर तरसोद-चिखली या नव्याने तयार झालेल्या चौपदरी महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाकडून वेग मर्यादेचे कोणतेही फलक न लावता रस्ता वाहतूक पोलिसांकडून वाहनात बसविलेल्या कॅमेरा स्पीड गण यंत्राद्वारे अवाजवी रक्कम दंड म्हणून आकारली जात आहे असे असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने सदर महामार्गावर ठीक ठिकाणी वेग मर्यादेचे फलक लावणेबाबत कोणती कार्यावाही केली तसेच वेग मर्यादेचे फलक न लावत रस्ता वाहतूक पोलीसांकडून वाहनात बसविलेल्या कॅमेरा स्पीड गन यंत्राद्वारे अवाजवी रक्कम दंड म्हणून वसूल करणाऱ्या सबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे.

या प्रश्नाला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उत्तर दिले तरसोद-चिखली (जि.जळगाव) या नव्याने तयार झालेल्या चौपदरी महामार्गावर निविदाशर्तीनुसार वेगमर्यादेचे फलक लावण्यात आले आहेत. तसेच गृह विभागाचे कळविल्यानुसार जळगाव पोलीस घटकात महामार्ग / रस्त्यावर वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध कारवाई करण्याकरिता इंटरसेप्टर वाहन उपलब्ध असून वाहतूक पोलिसांकडून अवाजवी दंड आकारले जात नसून मोटार वाहर कायद्यान्वये निर्धारित दंड आकारण्यात येतात. सदर राष्ट्रीय महामार्ग हा केंद्र शासनाच्या भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) यांचे अखत्यारीत येतो.

Leave A Reply

Your email address will not be published.