मुंबईत 27 वर्षीय जळगावच्या डॉक्टरने उचलले टोकाचे पाऊल, इंजेक्शन घेऊन संपवले आयुष्य

0

मुंबई:-  पालिकेच्या सर्वात मोठ्या रूग्णालयातील के ई एम क्षयरोग विभागात जळगावतील रहिवासी असलेल्या एका निवासी डॉक्टरने विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. २७ वर्षीय डॉ. आदिनाथ पाटीलची शिवडीच्या टीबी रूग्णालयात रात्री इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

 

दरम्यान, आदिनाथ सकाळी ८ वाजता नेहमीप्रमाणे ओपीडीला न आल्याने त्याच्यासोबतच्या डॉक्टरांनी त्याच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. परंतु, खोलीच्या आतून कोणाताही प्रतिसाद न मिळल्याने परिचारिकेने मागच्या बाजूने दरवाजा उघडला. त्यावेळी आदिनाथ मृतावस्थेत आढळून आला. या घटनेने रुग्णालय प्रशासनामध्ये खळबळ माजली.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. आदिनाथ मेडिसिन विभागाच्या पहिल्या वर्षात पदव्युत्तर शिक्षण घेत होता. आदिनाथ जळगावचा असून त्याचे वडिल डॉक्टर संजय पाटील आणि डॉक्टर स्मिता पाटील राहणार आकाशवाणी परिसर जळगाव यांचा तो मुलगा आहे . केईएम रूग्णालयातील मेडिसिन विभाग दुरूस्तीच्या कारणास्तव शिवडी टीबी रुग्णालयात हलवण्यात आलाय. परंतु शिवडी रूग्णालयात सोयीसुविधा नसल्याने निवासी डॅाक्टरांना मनस्ताप सहन करावा लागत होता. अशी माहिती समोर येत आहे.

दरम्यान पोलिसांनी विश्रांती गृहातून इंजेक्शन जप्त केली आहेत. रूममधून कोणतीही सूसाईड नोट जप्त करण्यात आली नसून डॉक्टर आदिनाथ पाटील यांनी टोकाचं पाऊल का उचललं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे. मूळचे जळगावचे असलेले आदिनाथ पाटील यांचे वडील आणि भाऊ हे तिघेही डॉक्टर आहेत. दरम्यान आरए के मार्ग पोलिसांनी अपघाती मृत्यूची (ADR ) नोंद करत तपासाला सुरवात केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.