महापालिका आयुक्तांवर अविश्वास प्रस्ताव म्हणजे नोटंकी आणि दबाव तंत्राचा भाग- एकनाथराव खडसे

0

जळगाव चकाचक करू म्हणणाऱ्या गिरीश महाजन यांनी कुठे नेऊन ठेवलय जळगाव 

जळगाव: -भाजपकडून महापालिका आयुक्त डॉक्टर विद्या गायकवाड यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव म्हणजे नोटंकी आणि दबाव तंत्राचा भाग असल्याची टीका माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केली यावेळी त्यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी निवडणुकीच्या वेळी जळगाव चकाचक करून दाखवण्याचे आश्वासन दिले मात्र कुठे नेऊन ठेवलय जळगाव अशी म्हणण्याची पाळी असल्याचे ही आमदार खडसे यांनी सांगितले.

एकनाथराव खडसे पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील कॅबिनेट मंत्री असूनआयुक्तांच्या बदलीला मॅटची अडचण नाही. मग अविश्वासाच्या नावाने आयुक्तांचे रेकॉर्ड खराब करू असा दम दिला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

सध्या शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 90% रस्त्यांची कामे सुरू असून यासाठी मनपाची परवानगी आयुक्तांची यासह इतर कटकटी नको म्हणून गैरविहार करण्याचा उत्तम मार्ग बांधकाम विभाग त्यामुळेच निविदांमध्ये अंदाजपत्रक वाढवता येऊन एकाच मक्तेदाराला कामे कशी मिळतात असा सवाल आमदार एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.