लोकशाही न्यूज नेटवर्क
ऑगस्टमहिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. पुढील दोन महिने मान्सून सामान्य राहण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. पण आता पुढील दोन महिने सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाकडून मान्सूच्या पुढील दोन महिन्यांसाठीचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. अल निनोच्या वाढत्या प्रभावामुळे पाऊस कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एवढेच नाही तर, राज्यात संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा जाणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
या वर्षी देशात सरासरी पेक्षा कमी पाऊस होणार असून, राज्यात देखील सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रात ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मान्सूनमध्ये अल निनोचा प्रभाव वाढत जाण्याचा अंदाज आहे. मात्र दुसरीकडे आयओडी पॉझिटिव्ह राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तीन दिवस पावसाची शक्यता
मुंबई, पुण्यासह राज्यात पावसाने थोडीफार उसंत घेतली आहे. पण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तीन दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आदी आहे. महाराष्ट्रामध्ये २, ३ आणि ४ ऑगस्ट रोजी दमदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ऑगस्टचा पहिला आठवडा सोडला तर राज्यात पाऊस कोसळण्याची शक्यता कमी आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.