मराठा आरक्षणासाठी ९ वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

0

नांदेड, लोकशाही न्यूज नेटवर्क

मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या आत्महत्यांचं प्रमाण वाढतच जात आहे. त्याचबरोबर आणखी एक अशीच घटना समोर येत आहे. मराठा समजला आरक्षण मिळावे यासाठी नांदेडच्या जवळ असलेल्या सोमेश्वर गावातील इ. ९वी मधील विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. कोमल तुकाराम वोकाटे असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी कोमल हिने स्वतःचा घरात चिठ्ठी लिहून ठेवली आहे.

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या कोमलचे वडील हे अप्लभूधारक शेजारी आहे. फक्त एक एकर त्यांची शेती असून त्यावर त्यांचा उदरनिर्वाह करतात. अशात मराठा आरक्षणासाठी कोमलने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याने वोकाटे कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.