ऑनलाईन परीक्षेत गैरप्रकार, दोघे मुन्नाभाईंवर गुन्हा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

ऑनलाईन परीक्षेत कानात ब्ल्युटुथचा वापर करून गैरमार्गाने उत्तरे लिहिणाऱ्या दोघे मुन्नाभाईंचा डाव धरणगाव पोलिसांनी हाणून पाडलाय. आशिष कुलदिप दहिया (रा. मोहम्मदाबाद जिल्हा सोनपत हरियाणा) आणि दिपक जोगिंदर सिंग (हिसार हरियाणा) अशी धरणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिस कॉन्स्टेबल पदासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनची ऑनलाईन परिक्षा धरणगाव येथील एका केंद्रावर सुरु होती. यावेळी आशिष दहिया आणि दिपक सिंग हे दोघे परिक्षार्थी या केंदावर परिक्षा देण्यासाठी आले होते.  या दोघे परिक्षार्थींच्या कानात पिवळसर व वरच्या बाजूला काळा पट्टा असलेला ब्ल्युटुथ डिवाईस आढळून आला.

दरम्यान या ब्ल्यु टुथ डिवाईसचा गैरवापर होण्यापुर्वीच दोघांना परिक्षा हॉलमधे जाण्यापासून अडवण्यात आले. दोघांविरुद्ध धरणगाव पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास स.पो.नि. सचिन शिरसाठ करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.