पायी जात असलेल्या तरुणीवर विनयभंग, आरोपी विरोधात गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील प्रिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाजवळून पायी जात असलेल्या तरुणीचा विनयभंग केल्याची घटना मंगळवार (दि. १४) रोजी घडली. या प्रकरणी रात्री उशिरा रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरात वास्तव्यास असलेल्या २१ वर्षीय तरुणी योग शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. मंगळवार (दि. १४) रोजी दुपारी कामानिमित्त पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाजवळून पायी जात होत्या. त्यावेळी संशयित निखिल सुरेश पाटील (रा.खोटेनगर, जळगाव) हा दुचाकीने तरुणीचा पाठलाग करू लागला. त्यानंतर तरुणीजवळ येऊन त्याने तिचा हात पासुन विनयभंग केला.

तसेच तरुणीला अश्लील शिवीगाळ करून धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर तरुणीने रात्री १० वाजता रामानंद नगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पिडीतेच्या तक्रारीवरून संशयित आरोपी निखिल पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक राजेश चव्हाण तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.