दुर्देवी: धावत्या रेल्वेतून पडून शिक्षकाचा मृत्यू

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

रूस्तमजी इंग्लिश मिडीयम स्कूलमधील २२ वर्षीय तरूण शिक्षकाचा जळगाव ते शिरसोली दरम्यान धावत्या रेल्वेतून पडल्याने दुर्देवी  मृत्यू झाल्याची घटना बुधवारी १५ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली आहे.विजय शाम सोनी (वय २२, रा. बऱ्हाणपुर मध्यप्रदेश ह.मु. जळगाव) सदर मयत तरूण हा मामाकडे जावून परतीच्या प्रवासात असतांना ही घटना घडली. याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगावातील स्तमजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विजय शाम सोनी हे शिक्षक म्हणून नोकरीला होते. ते मुळ रहिवाशी मध्यप्रदेशातील बऱ्हाणपुर येथील रहिवाशी आहेत. दिवाळी निमित्त ते कल्याण येथील मामांकडे भेटण्यासाठी गेले होते. कल्याणहून परत ते मुळगावी बऱ्हाणपुर येथे जाण्यासाठी बुधवारी १५ नोव्हेंबर रोजी रेल्वेने प्रवास करीत असताना जळगाव ते शिरसोली दरम्यान  रेल्वे खंबा क्रमांक ४०७ जवळ धावत्या रेल्वेतून विजय सोनी हे पडले.

दरम्यान जळगाव रेल्वे पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल सचिन भावसार यांनी घटनास्थळी धाव घेवून जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी पुढील तपास हेडकॉन्स्टेबल सचिन भावसार करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.