वेशांतर करून पोलिसांनी मटका घेणाऱ्या तिघांना अटक

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

सोलापूर : वेशांतर करून पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने शहरात दोन ठिकाणी मटका घेणाऱ्या तिघांना पकडले. याप्रकरणी फौजदार चावडी व जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकाश सुखदेव सुरवसे (रा. जुनी पोलीस लाइन, निराळे वस्तीरोड) समीर इसाक दामरगिद्दे (रा. साखर पेठ, इकरार अल्ली मशीदजवळ, सोलापूर), यलप्पा काशीनाथ शिंदे (रा. ढोर गल्ली, शुक्रवार पेठ, सोलापूर), असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शहरात चोरून मटका घेत असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली होती.

मिळालेल्या माहितीवरून वेशांतर करून पथकाने धाड टाकली असता, प्रकाश सुरवसे हा जुनी पोलीस लाइनच्या बोळात कल्याण मटका घेताना आढळून आला. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

शुक्रवार पेठेतील ढोर गल्लीमधील महानगरपालिका शाळा क्र. ३ च्या जवळ धाड टाकली असात, इमारतीबाहेर आडोशाला दोघे मटका घेत होते. समीर दामरगिद्दे व यल्लप्पा शिंदे हे दोघे कल्याण नावाचा मटका घेताना आढळून आले.

दोघांवर जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त हरिश बैजल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे, हवालदार दिलीप भालशंकर, योगेश बर्डे, वाजीद पटेल, पोलीस कॉन्स्टेबल संजय साळुंखे, नरेंद्र नक्का, बापू साठे यांनी पार पाडली.

Leave A Reply

Your email address will not be published.