चोरीच्या हेतूने फिरणाऱ्या तिघांना अटक; गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील तांबापुरमध्ये चोरीच्या हेतूने संशयास्पद फिरत असलेल्या तीन जणांना एमआयडीसी पोलीसांनी पेट्रोलींग करतांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पो.ना. सुधीर सावळे, पो.ना. किशोर पाटील, पो.कॉ. मुकेश पाटील, पो.कॉ. सचिन पाटील हे बुधवार २ मार्च रोजी रात्री १० वाजता शहरातील तांबापूरा भागात पेट्रोलींग करत असतांना सदोबा वेअर हाऊस येथील अंधारात तीन जण संशयास्पदरित्या हालचाली करतांना आढळून आले.

दरम्यान एमआयडीसी पोलीसांनी पाठलाग करून तिघांना ताब्यात घेतले. यात शाहरूख राजू पिंजारी (वय २६), समीर जुम्मा पिंजारी (वय २०) आणि फिरोज खान अब्दूल खान (वय ३६) सर्व राहणार एकनाथ नगर रामेश्वर कॉलनी असे नावे असल्याचे समोर आले. पोलीसांनी विचारलेल्या प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने तिघांना ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी पोलीस नाईक सुधीर सावळे यांच्या फिर्यादीवरून बुधवार २ मार्च रोजी रात्री उशीरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.