सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग – आरोपी ताब्यात

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

शहरातील ३० वर्षीय तरूणाने घरासामोरील ६ वर्षाच्या बालिकेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पिडित बालिकेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असुन आरोपीला अटक करण्यात आली आहे.

याबाबत पाचोरा पोलिसात भाग – ०५ गुरन ३९९ भा.द.वी. ३७६अ, ब, प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यात नमुद करण्यात आले आहे की, पिडित बालिका संशयित आरोपीच्या घरी दुपारी त्याच्या मुलीसोबत खेळण्यास आली असता तिला लज्जा निर्माण होइल असे कृत्य केले. सदर घटनेने घाबरून बालिकेने घडलेला प्रकार घरी सांगितला असता पिडीतेच्या कुटुंबाने पाचोरा पोलिसात याबबत तक्रार नोंदवली. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपिला अटक केली असुन, नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.