खुशखबर ! LPG सिलेंडर ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महिन्याच्या पहिल्याच दिवशी तुमच्यासाठी खुशखबर आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या (LPG gas cylinder) दरात मोठी घट झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी एलपीजी सिलिंडरचे दर 91.5 रुपयांनी कमी झाले आहेत.

इंडियन ऑइलने (Indian Oil) 1 सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या किमतींनुसार, राजधानी दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 91.5 रुपयांनी स्वस्त झाला आहे. आजपासून सिलिंडरसाठी 1885 रुपये मोजावे लागणार आहेत. पूर्वी हा सिलेंडर 1976.50 रुपयांचा होता.

सलग पाचव्यांदा किमतीत घट

सलग पाचव्यांदा व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत घट झाली आहे. मे महिन्यात विक्रमी 2354 रुपयांवर पोहोचलेला 19 किलोचा सिलेंडर आता दिल्लीत 1885 रुपयांवर आला आहे.

शहरातील भाव 

राजधानी दिल्लीत आता यासाठी 1976.50 ऐवजी 1885 रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच कोलकात्यात 2095.50 ऐवजी 1995.50 रुपये, मुंबईत 1936.50 ऐवजी 1844 रुपये आणि चेन्नईमध्ये 2141 ऐवजी 2045 रुपये मोजावे लागतील. दिल्लीत 14.2 किलोचा गॅस सिलिंडर 1053 रुपयांना मिळत आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत सलग पाचव्यांदा घसरण झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.