आपलं नाणं खोटं आहे याची त्यांना खात्री – शरद पवार

0

शरद पवार यांची अजित पवार , नरेंद्र मोदी, छगन भुजबळांवर खरपूस टीका

मुंबई ;- आपलं नाणं खोटं आहे याची खात्री आमच्या मित्रांना आहे. त्यामुळेच त्यांच्या त्या बैठकीत आणि मेळाव्यात माझा मोठा फोटो लावण्यात आला असं वक्तव्य शरद पवार यांनी केले. अजित पवार यांनी आज भाषण करत असताना निवृत्तीच्या वयाची आठवण शरद पवार यांना करुन दिली. मात्र शांत आणि संयत भाषण करत शरद पवार यांनी अजित पवार यांचा समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित पवार, तसंच त्यांच्यासह गेलेले आमदार यांच्यावर टीका केली.

“आज काही लोकांनी भाषणं केली. बोलताना सांगत होते शरद पवार आमचे गुरु आहेत. आमच्या मित्रांचा मेळावा झाला त्यात फोटो पाहिले का? सगळ्यात मोठा फोटो होता माझा. मुंबईत पोस्टर लावली की फोटो माझा. त्यांना माहित आहे आपलं नाणं चालणार नाही. त्यामुळे चालणारं नाणं घेतलं पाहिजे. त्यांचं नाणं खरं नाही ते खणकन वाजणार नाही अडचण नको म्हणून त्यांनी माझा फोटो वापरला आहे. पांडुरंगाच्या दर्शनाला बडवे जाऊ देत नाहीत असाही आरोप झाला. कसले बडवे? पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं असेल तर कुणी अडवत नाही. पांडुरंग म्हणायचं, गुरु म्हणायचं आणि आमच्याकडे दुर्लक्ष झालं म्हणायचं ही गंमतीची गोष्ट आहे असं मला वाटतं” असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

आजची बैठक ही एक ऐतिहासिक बैठक आहे. संपूर्ण देशाचं लक्ष आपल्या बैठकीकडे आहे. संपूर्ण देशात चर्चा आहे की २४ वर्षांपूर्वी तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला. षण्मुखानंदमध्ये बैठक झाली त्यानंतर शिवाजी पार्कवर लाखांची सभा झाली. पक्षाची स्थापना केल्यानंतर आज २४ वर्षे झाली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेतृत्वाची फळी उभी करण्याचं यश राष्ट्रवादीला आलं. कुणी आमदार आले, कुणी खासदार आले कुणी नगरसेवक झाले. सामान्य कुटुंबातला कार्यकर्ताही राज्य चालवू शकतो हे राष्ट्रवादीने दाखवून दिलं. आपण अनेक नवे नेते तयार केले. मनात एकच बाब होती ती म्हणजे महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा. या राज्यातल्या शेवटच्या माणसाच्या जीवनात प्रकाश कसा येईल याची काळजी घ्यायची असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.