ED, CBI चा पाऊस पडला की निष्ठेचा चिखल होतो – डॉ अमोल कोल्हे

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

आज राष्ट्रवादीतील दोन्ही गटाच्या बैठका पार पडल्या. कोल्हे कोणत्या गटात जाणार याबद्दल मोठी चर्चा सुरू होती. मात्र आज ते शरद पवारांच्या बैठकीत सामील झाले. शरद पवार यांच्या गटातून खासदार अमोल कोल्हे यांनी आपली शरद पवारांसोबतचं आपलं नातं उलगडलं. काय म्हणाले अमोल कोल्हे ?

बैठकीत डॉ अमोल कोल्हे म्हणाले की, पाऊस पडला की चिखल होतो. ED आणि CBI चा पाऊस पडला की निष्ठेचा चिखल होतो. त्यांनी भुजबळांच्या म्हणण्याला खोडून काढत म्हटले कि, मन लावून भक्ती केली असती तर पांडुरंग पावला असता. आज अनेक जणं म्हणतील की आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं. मात्र बडव्याचं कारण का द्यावा,, कारण त्यांना विठ्ठल कळाच नाही. मनातून निस्सिम भक्ती केली असती तर पांडूरंग पावला असता. त्या दिवशी मी स्वत: राजभवनात होतो. त्यावेळी सांगितलं की, मी खासदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे. कारण काय कारण जर या पद्धतीने पक्ष फोडले गेले तर राजकारणातील नैतिकता सर्वसामान्यांनी विश्वास ठेवून जे मतदान केलं, त्याचं काय होणार?

मी आतापर्यंत कधी असं एकलं नाही की माझ्या बापानं निष्ठा विकली, मला रोज पंचपक्वान दिलं असं कोणता मुलगा अभिमानानं सांगताना कधी ऐकलं नाही, मात्र माझ्या बापाने स्व कष्टानं चटणी भाकरी दिली, असं सांगणं ही संस्कृती महाराष्ट्राची आहे. नवीन कार्यालयाचं नाव वाचून अनेक प्रश्न निर्माण झाले. नव्या कार्यालयाला प्रतापगड हे नाव देण्यात आलं. मात्र त्यांनी एकदा प्रतापगडाचा इतिहास पाहावा. आणि कानोजी जयदाचा आदर्श घ्यावा. ही लढाई गुरू शिष्यची नाही. धर्मावर अधर्माची आहे.

यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीचा प्रचार प्रमुख होऊन, लोकांच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार पेरण्यासाठीचे कार्य सोपोवले.

Leave A Reply

Your email address will not be published.