आजच्या काळातील शिक्षण व विदयार्थी

0

लोकशाही विशेष लेख

माणसाच्या प्रमुख तीन मुलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा. त्याचबरोबर आरोग्य आणि शिक्षण. त्याचबरोबर पाहीलं तर या काळात मोबाईल सुद्धा एक गरज बनली आहे. तसेच विद्यार्थी शिक्षणाच्या आहारी कमी तर मोबाईलच्या आहारी जातांना दिसतात. तर शिक्षण हे कमी व मोबाईल ही गरज बनली आहे असे म्हणाय़ला हरकत नव्हे.

शिक्षण ही काळाची गरज आहे, तर ती आपली सुद्धा गरज आहे. सर्वांनी जर असा विचार केला तर शिक्षण क्षेत्रात खुपच मोठ्या संख्येने वाढ होईल. जगा समोर एक उत्तम उदाहरण म्हणजे सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले या खूप महान स्त्री बनून गेल्या. म्हणून त्यांच उदाहरण व त्याचां आदर्श घ्यायला हवा. त्यांची कामगिरी खुप कर्तुत्वान आहे.

सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांनी मुलींच्या शिक्षणासाठी खूप त्रास सहन केले व शेवटी त्यांना यश प्राप्त झालेच. म्हणून प्रत्येक विद्यार्थीनी आपल्या स्वतामध्येच सावित्रीबाई शोधली पाही. जे त्यांच्या सारखी उत्तम कामगिरी केली पाहीजे. प्रत्येक घरात एक जरी स्त्री शिकली तरी ती तिच्या संपूर्ण घराला पुढे नेऊ शकते, तसेच विदयार्थीनी नव्हे तर विदयार्थी सुद्धा यशस्वी होऊ शकता. असं म्हणता ना की प्रयत्न केला तर फळ मिळत. तसंच प्रयत्न केला नक्कीच यश मिळतं अस म्हणायला सुद्धा हरकत नव्हे.

प्रत्येक आईवडीलांना अस वाटत की, माझा मुलगा, मुलगी शिकली पाहिजे. तर प्रत्येक मुला मुलींनी विचार करायला हवा व ते करून दाखवलं पाहीजे. शिक्षण हे पैसे कमवायचे साधन नाही तर ते ज्ञानाचा सागर आहे शिक्षणाला वयाची मर्यादा नसते.

जसे शिक्षण हे शिक्षकांन शिवाय अपूर्ण आहे, तसेच विदयार्थी सुद्धा शिक्षकांन विना अपूर्ण आहेत. त्यांच्यासारख इतक मोलाच काम फक्त तेच करू शकता. म्हणून आपण त्यांच्या सारखे बनू शकतो. मानवात असलेल्या सुप्त गुणांना, दैवी गुणांचा परिसस्पर्श प्राप्त करून देण्याचे काम शिक्षकाकडून अपेक्षित असते.

शिक्षणाबद्दलचं स्वामी विवेकानंदचं एक प्रसिद्ध वाक्य म्हणजे Education is the manifestation of perfection already Present in man. माणसाचे शरीर, मन आणि आत्मा यांतील सुप्त गुणांचा विकास म्हणजे शिक्षण होय. शिक्षणाबरोबर तसेच प्रत्येक शिक्षक मुलांना, संस्कार द्यायचे काम सुद्धा शिक्षक करतात. म्हणून मला शिक्षणाबद्दल मोजंक व दोन शब्द असे बोलायचे की, Eduction is the key to success.

पल्लवी प्रदिप शिंदे
भादवड जि. नंदुरबार

Leave A Reply

Your email address will not be published.