मराठमोळा अजित आगरकर झाला मुख्य निवडकर्ता…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर याची भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अशोक मल्होत्रा ​​यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) मुलाखतीनंतर त्यांची या पदासाठी निवड केली. बीसीसीआय नियुक्तीची औपचारिकता पूर्ण करू इच्छित आहे. कारण आगरकर पदभार स्वीकारल्यानंतर वेस्ट इंडिजमध्ये पाच T20 सामने खेळणाऱ्या संघाची निवड समितीच्या बैठकीचे अध्यक्षतेत करतील. बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, “मुलाखतीसाठी आगरकर हा एकमेव उमेदवार आहे. तो सध्या कौटुंबिक रजेवर परदेशात असल्याने त्याने ऑनलाईन माध्यमातून मुलाखतीला उपस्थित होता.”

बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रक जारी करून याबाबत माहिती दिली आहे.

सुलक्षणा नाईक, अशोक मल्होत्रा ​​आणि जतीन परांजपे यांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने (CAC) पुरुषांच्या निवड समितीमध्ये निवडकर्त्याच्या पदासाठी अर्जदारांची मुलाखत घेतली. तीन सदस्यीय CAC ने या पदासाठी अजित आगरकर यांची एकमताने शिफारस केली आहे.

भारताच्या माजी अष्टपैलू खेळाडूने 110 प्रथम श्रेणी, 270 लिस्ट ए आणि 62 टी-20 सामने खेळण्याव्यतिरिक्त 26 कसोटी, 191 एकदिवसीय आणि चार टी-20 सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. माजी वेगवान गोलंदाज म्हणून, तो 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या उद्घाटनिय T20 विश्वचषक स्पर्धेत भारताच्या विजयी संघाचा भाग होता. एकदिवसीय क्रिकेटमध्‍ये भारतीय फलंदाजाने सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम अद्यापही त्याच्या नावावर आहे, जो त्याने 21 चेंडूत केला होता. त्याने 2000 साली झिम्बाब्वेविरुद्ध अर्धशतक झळकावले होते. जवळपास एका दशकात सर्वात जलद 50 एकदिवसीय विकेट्स घेण्याचा विक्रमही त्याने केवळ 23 सामन्यांमध्येच साधला.

त्याच्या कारकिर्दीनंतर, त्याची मुंबईच्या वरिष्ठ संघासाठी मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये प्रशिक्षकाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. समितीने ज्येष्ठतेच्या आधारावर (एकूण कसोटी सामन्यांची संख्या) पुरुष निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी आगरकरची शिफारस केली.

 

5 सदस्यांची निवड समिती

  1. अजित आगरकर (अध्यक्ष)

२. शिव सुंदर दास

  1. सुब्रतो बॅनर्जी
  2. सलील अंकोला
  3. श्रीधरन शरथ

Leave A Reply

Your email address will not be published.