खरी शिवसेना हि उद्धव ठाकरे यांचीच – कपिल सिब्बल

0

धनुष्यबाण कुणाचे ? शिवसेना कुणाची ? निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरु !

लोकशाही न्यूज नेटवर्क

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करून आपल्या समर्थक आमदारांसह राज्यात सत्ता स्थापन केली. मात्र शिवसेना कुणाची धनुष्यबाण कुणाचे यावर सध्या दोन्ही गटात वाद सुरु असून याबाबत नुकतीच निवडणूक आयोगाकडे सुनावणीला सुरुवात झाली आहे ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी शिवसेना हि उद्धव ठाकरे यांचीच असल्याचे म्हटले आहे.

आमदारांच्या निलंबनाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असून न्यायालयाचा निर्णयापर्यंत कोणताही निर्णय देऊ नका, अशी मागणी कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसेच शिंदे गटाने सादर केलेली कागदपत्रे खोटी असल्याचेही सिब्बल म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची मुदत २३ जानेवारी रोजी संपणार आहे. त्यामुळे संघटनात्मक निवडणुकीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली. याबाबतही आयोग निर्णय देण्याची शक्यता आहे.

शिंदे गटाच्या कागदपत्रात त्रुटी नाही – महेश जेठमलानी

ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी शिंदे गटाची बाजू मांडत आहेत. आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नावाबाबत लवकरात लवकर निर्णय द्यावा, अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.

शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केलेली कागदपत्रे खोटी असल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी युक्तीवादादरम्यान केला होता. हा दावा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी खोडून काढला आहे. शिंदे गटाच्या कागदपत्रात कोणत्याही त्रुटी नाहीत, असं ते म्हणाले.

  • ठाकरे गटाकडे राष्ट्रीय कार्यकारणीतील प्रतिनिधींची 107 प्रमाणपत्रे, संघटनात्मक प्रतिनिधींची 2 लाख 82 हजार प्राथमिक सदस्यांची 19 लाख नोंदणी आणि प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आली आहे.
  • शिंदे गटाकडून प्राथमिक सदस्य 4 लाख 48 हजार आहेत. 13 खासदार आणि 40 आमदारांसह संघटनात्मक प्रतिनिधी 711 आहेत.
  • शिंदे गटाकडे एकूण 4 लाख 51 हजार 127 एवढी प्रतिज्ञापत्र असून आज शेवटच्या क्षणापर्यंत शिंदे गटाकडून कागदपत्रे आणली गेली.
  • कागदपत्रांचे गठ्ठे एका मोठ्या खोलीत जमा करण्यात आली असून सुरक्षाव्यवस्थाही केली गेली आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.