ब्रेकिंग; ठरलं तर मग, या दिवशी कळेल राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण ?

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

 

शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय काल कार्यक्रमात घेतल्यानंतर, राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तर पवारांनी आपला निर्णय मागे घेण्याचा हट्ट धरला. पण आता महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपादाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खळबळ उडाली होती. त्यानंतर तर्क वितर्क लावण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पद सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या कडे येऊ शकते. असं म्हंटल जात आहे.

पण आता राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीची बैठक ही 6 मे रोजी होणार होती. पण आता शरद पवारांनी सांगितल्यानुसार ही बैठक 5 मे रोजी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवार आपला निर्णय मागे घेणार का? किंवा राष्ट्रवादीला नवा अध्यक्ष मिळणार याचं उत्तर 5 मे ला मिळणार आहे. निवड समितीची बैठक जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल, असं शरद पवार यांनी सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. तसेच कार्यकर्ते आणि नेते यांना विश्वासात घेऊन याबाबतचा निर्णय जाहीर करायला हवं होतं हे मला जाणवत आहे, अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली. पण विचारुन राजीनामाची घोषणा केली तर विरोध झाला असता, असंही शरद पवार म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.