गौतमी पाटील चे आक्षेपार्ह व्हिडिओ काढणाऱ्याला श्रीगोंदयातून केले जेरबंद

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

आपल्या दिलखेच अदा, आणि नृत्याने सर्वांनाच घायाळ करणारी गौतमी पाटील (Gautami Patil) चर्चेत आली तर तिच्या नृत्यात केलेल्या अश्लील हावभावामुळे, त्यावेळीस गौतमीला प्रचंड ट्रोल करण्यात आले. तिच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार देखील करण्यात आली होती. पोलिसांनी समज दिल्यानंतर गौतमीने माफी मागितली व सर्व वाद सावरायचा प्रयत्न केला. पण तोच काही दिवसांनी तिचे कपडे बदलतानाचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्यात आले होते. तिच्या नावाने बनावट खाते काढून हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता. त्यानंतर महाराष्ट्र महिला आयोगाने (Maharashtra Commission for Women) देखील दखल घेतली होती. गौतमी पाटीलचा व्हिडिओ काढणारा कोण याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली होती.

ह्या प्रकरणाचा तपास सुरु असतांनाच एक ढक्कादायक बाब समोर येत आहे. या प्रकरणी अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरेखांड येथील एका अल्पवयीन मुलाने गौतमी पाटील या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाउंट उघडून गौतमी पाटील चे आक्षेपार्ह व्हायरल केल्याप्रकरणी श्रीगोंदयातून जेरबंद केल आहे. मुलाने वापरलेले सिम कार्ड त्याच्या आईच्या नावावर आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने गुरुवारी विमाननगर पोलीस ठाण्यात आई- वडील आणि मुलगा यांना हजर होण्यास सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.