चौबारीच्या शहीद जवानाचा मरणोत्तर दिल्लीत सन्मान…

0

 

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

रेल्वे विभागात कर्तव्यावर असताना अपघाती निधन झाल्याने तालुक्यातील चौबारी येथील जवानाचा दिल्ली येथे मरणोत्तर सन्मान करण्यात आला. चौबारी येथील दिलीप फकिरा सोनवणे हे रेल्वे सुरुक्षा बलात कर्तव्यावर होते. १३ ऑगस्ट रोजी इगतपुरी, कसारा रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर असताना त्यांचा अपघात झाला. त्यात त्यांचे दुर्दैवी निधन झाले.

त्यांनी दिलेली तत्पर सेवा व प्रभावी कार्य पाहता त्यांचा २८ रोजी दिल्ली येथे रेल्वे विभागाच्या वरिष्ठांच्या उपस्थितीत मरणोत्तर त्यांच्या पत्नी आशाबाई दिलीप सोनवणे यांना सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी शाम फकिरा सोनवणे, शरद दिलीप सोनवणे, विकी दिलीप सोनवणे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.