जळगावात विवाहितेने गळफास घेत संपविला जीवन प्रवास…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

घरात कोणीही नसताना जळगावात विवाहितेने राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. विवाहितेचे मुले क्लासमधून घरी आले त्या वेळी ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. सीमा शशिकांत कासोट (३३)  असे मयत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, शशिकांत कासोट हे सिद्धीविनायक कॉलनीमध्ये पत्नी व मुलासह राहतात. सोमवार, ३० ऑक्टोबर रोजी पती शशिकांत कामावर, तर मुले क्लासला गेलेले होते. त्यामुळे सीमा कासोट या घरी एकट्याच होत्या. त्या वेळी त्यांनी घरात ओढणीने गळफास घेतला. संध्याकाळी मुले क्लासमधून घरी आले तर घराचा दरवाजा आतून लावलेला होता.

मुलांनी बराच वेळ आवाज दिला तर प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी शेजारील लोकांना याबाबत कल्पना दिली. शेजारच्यांनी दरवाजा उघडला असता मुलांसह शेजारील मंडळींना सीमा या गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्या. या विषयी विवाहितेचे पती व रामानंद नगर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस घटनास्थळी पोहचले व विवाहितेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांनी मृत घोषित केले. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात रात्री अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ नीलेश पाटील करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.