सावद्यात वृध्द व्यक्तीने राहत्या घरात घेतला गळफास

0

सावदा ;- येथे एका ७५ वर्षीय वृध्द व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. याबाबत सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. उखर्डू लालू चौधरी (वय-७५) रा. सावदा ता. रावेर असे मयत वृध्दाचे नाव आहे.

उखर्डू चौधरी हे १२ एप्रिल रोजीच्या मध्यरात्री त्यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सावदा पोलीसांनी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात मुलगा, सुन आणि नातवंडे असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.