अनोळखी तरूणाचा रेल्वेखाली आल्याने जागीच मृत्यू

0

जळगाव ;- एका अनोळखी तरूणाचा जळगाव ते भादली रेल्वे अप रेल्वे लाईनवर धावत्या रेल्वेखाली आल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत शनीपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, जळगाव ते भादली दरम्यानच्या अप रेल्वे लाईनवरील खंबा क्रमांक (४२१च्या १२ ते १० ) दरम्यान धावत्या हमसफर एक्सप्रेसचा जोरदार धक्का लागल्याने अनोळखी अंदाजे ३२ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी १३ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. लोकोपायटल गिरीश तांबे यांनी दिलेल्या खबरीनुसार शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोहेकॉ परिष जाधव मृतदेहाचा पंचानामा केला. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयताची ओळख पटविण्याचे आवाहन शनीपेठ पोलीसांनी कळविले आहे. पुढील तपास पोहेकॉ परेश जाधव करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.