सावदा येथे बंद घरातून सव्वा लाखांचा ऐवज लांबविला

0

 

सावदा , लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील एका बंद घरातून अज्ञात चोरटयांनी १ लाख १० हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना सोमेश्वर नगरात उघडकीस आली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमेश्वर नगरात बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त कर्मचपारी देविदास गंभीर तायडे हे राहत असून त्यांनी नुकतेच नवीन घर बांधले होते. त्यामुळे घरातील सामान शिफ्टिंगचे काम सुरू होते. दरम्यान, बंद घर असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातील सोन्याची मंगलपोत आणि ५० हजारांची रोकड असा एकुण १ लाख १० हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे समोर आले.
याप्रकरणी सावदा पोलीस ठज्ञण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.