प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य : महर्षि चरक

0

लोकशाही, विशेष लेख

 

महर्षि चरक (Maharishi Charak) हे एक प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य होते. हे कनिष्क राजाचे राजवैध होते. यांनी आयुर्वेद विषयावर “चरक संहिता” (Charaka Samhita) का प्रसिद्ध ग्रंथ लिहीता चरक हे पंजाबातील एक वैदिक चरण होते वैध चरक हे, त्या सांप्रदायातील असावेत अग्निवेश हे चरकांचे गुरु होते- चरक यांचा शेषनागाचा अवतार मानतात, त्या बद्दलची एक कथा भावप्रकाश या ग्रंथात दिलेली आहे ती कथा पुढील प्रमाणे आहे.

भगवान विष्णुनी मत्स्यवतार घेऊन वेदांचा उध्दार केला त्यातच अथर्ववेदाच्या अंतर्गत आयुर्वेद सुद्धा त्यांना प्राप्त झाला. एकदा शेषनाग पृथ्वीवर गुप्तचर बनून भ्रमण करू लागले त्यात त्यांनी भुतलावर अनेक लोक – व्याधीग्रस्त झाल्याचे पाहीले हे बघून भगवान शेषांना अतिशय दुःख झाले. हे लोक व्याधी- मुक्त कसे होतील याचा विचार ते करू लागले पुढे हे कार्य सिद्धीस जावे म्हणून ते पृथ्वीवरच एका व्यक्तीच्या पोटी जन्माला आले, आणि चरक या नावाने प्रसिद्ध झाले.. आत्रेय यांच्या अग्निवेशादी शिष्यांच्या तंत्रावर संस्कार करून शेष यांचा अवतार असलेला चरकांनी आपली चरक संहिता लिहीली.

चरक संहितेचे स्वरूप

चरक संहितेत एकुण आठ स्थाने आहेत.

सूत्र स्थान
या स्थानात वैद्यक शास्त्राची व्यवस्था कळण्यासाठी जी माहीती थोडक्यात मुद्दांची व विशेष स्पष्ट अशी आहे ती देणे. या प्रमाणे या स्थानात ती माहिती दिली गेलेली आहे. सूत्र स्थान समजावून घेतल्या शिवाय वैद्यक शास्त्राची पायाभूत ज्ञान घेणे कठीण आहे. हया स्थानात दिर्घआयुष्य होण्यासाठी विचार, त्रिदोषाचे स्वरूप, पेयांचे गुणधर्म, व प्रमुख रोगांची उपचार व्यवस्था इत्यादि अनेक महत्वाचे भाग यात दिलेले आहेत.

निदानस्थान
निरनिराळे रोग होण्याची कारणे व त्याचे स्वरुप या विषयी या प्रकरणात फारच उत्तम माहिती दिली गेलेली आहे. निदानाविषयी जितकी विस्तृत व नेमस्त लक्षणांची माहिती असेल तितका उपचारास सुलभपणा प्राप्त होतो हि गोष्ट कोणीही कबुल करेल याबद्दल आधीच आयुर्वेदात फार बारकाईने माहिती दिली आहे.

विमान स्थान
या स्थानात त्रिदोष, औषध, देश, काल (समय) बल, पुष्टी, शरीर (रचना) अन्नपान प्रकारचे सात्म्य (सहवास) सत्व, मानसिक बल, प्रकृती व वय यांचे प्रमाण कळल्याशिवाय वैद्याला बरोबर योजना करता येणार नाही. याकरिता सदर स्थान हे चरक संहितेतील एक महत्त्वाचे स्थान आहे.

शरीर स्थान
यात शरीराची रचना याबाबतीत तर माहिती दिलेली आहेच. पण गर्भ बाळंतपण या संबंधात कित्येक महत्त्वाच्या बाबतीत स्पष्ट रीतीने उहापोह केला आहे.

इंद्रिय स्थान
या स्थानामध्ये आयुष्य समजून घेण्याची परीक्षा अतिशय विस्ताराने सांगितले आहे. रोगी व निरोगी अशा दोन्ही प्रकारच्या स्थितीत आयुष्यनाश झाल्याची दर्शक लक्षणे कोणती दिसतात, रोगी स्थितीत कोणती लक्षणे दिसतात याची माहिती विस्ताराने या स्थानात दिलेली आहे. अशी व इतकी माहिती कोणत्याही आधुनिक ग्रंथात सापडत नाहीत.

चिकित्सा स्थान
सहावे स्थान चिकित्सा स्थान आहे. चिकित्सा म्हणजे उपचार स्थानाविषयी पुढील श्लोक प्रसिद्ध आहे.

निदाने माधवः श्रेष्ठ: सूत्रस्थाने तू वागभट्ट
शरीरे सुश्रुतप्रोत्तम चरकस्तु चिकित्सिते

कल्पस्थान
निरनिराळ्या वन औषधींचे निरनिराळ्या रोगांवर कसे कसे उपाययोजावे याविषयी भरपूर माहिती या स्थानात दिलेली आहे.

सिद्धी स्थान
वैद्यकाची तत्त्वशः कर्म कोणकोणती आहेत, ती कशी आणि कोणकोणत्या रोगांवर कोणकोणत्या प्रमाणात जुटावी इत्यादी माहिती निरनिराळ्या कर्मांना अनुलक्षण स्पष्ट व मुद्देसूद दिलेली आहे.

द्वारकाधीश दिगंबर जोशी
एम.ए. बी.एड (संस्कृत)
दूरध्वनी 0257-2236815
जळगाव

Leave A Reply

Your email address will not be published.