बस नसल्यामुळे मनवेल परीसरातील विद्यार्थ्यांची पायपीट !

0

यावल आगाराच्या भोंगळ कारभार बद्दल पालक वर्गातून संताप

मनवेल ता.यावल : लोकशाही न्युज नेटवर्क

यावल आगारातून सकाळी ६ वाजेला सुटणारी यावल मनवेल – शिरागड बस ब्रेक डाऊन झाल्याने बस गावात आलीच नसल्यामुळे मनवेल, थोरगव्हाण, पिळोदा खुर्द, शिरागड ,पथराडे येथील विद्यार्थ्यांची पायपीट झाली.

३ एप्रिल सोमवार पासून पाचवी ते नववीच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुंलाचे वार्षिक परीक्षा सुरु झाल्या असून पहील्याच पेपरला एस.टी. आली नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागली असल्यामुळे यावल आगाराच्या भोंगळ कारभार बद्दल पालक वर्गातून संताप व्यक्त होत आहे.

मनवेल व साकळी येथे थोरगव्हाण पथराडे शिरागड पिळोदा खुर्द येथील विद्यार्थी शिक्षण करीता ये जा करीत असून सकाळ सत्रात एक एप्रिल पासून शाळा सुरु झाल्यावर सुध्दा यावल आगारातून सकाळी ६ वाजता नियमित सुरु असलेली बस खराब झाल्यावर दुसरी बस आलीच नसल्यामुळे दिडशेच्या वर विद्यार्थ्यांना पेपर करीता पायपीट करावी लागली.

जळगाव जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन बद्दल आढावा घेऊन एक एप्रिल पासून प्राथमिक व माध्यमिक शाळा सकाळी सात ते दुपारी एक पर्यत सुरु करण्याचा निर्णय घेतला असून सकाळी येणाऱ्या बस विद्यार्थी क्षमता जास्त असल्यामुळे दोन सोडण्यात याव्या व विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाकावे अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.