मुंबईचा पोलिसवाला आला; साप पकडून घेऊन गेला !

0

 

लोहारा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

विषारी आहे की बिनविषारी… साप म्हटले की अरे बाप..! अंगावर शहारे आल्याविना राहत नाही. पूर्वी साप दिसला की त्याचा मुडदा कसा पाडू यासाठी अनेक ग्रामस्थ पुढे येत होते. त्याचे कारणही तेवढे भयानक होते पूर्वी धास्तीने माणूस अर्धा व्हायचा, अघोरी उपचार झाल्याने तो पूर्ण मरायचा, पण आता अनेक धाडसी सर्पमित्र निर्माण झाले. त्यांनी नैसर्गिक साखळी विषयी जनजागृती ग्रामस्थांमध्ये केलेली असून त्याला शासनाचे धोरणही पॉझिटिव्ह आहे. अनेक सर्पमित्र त्यांनी योगदान म्हणून त्यांचे मोबाईल नंबर सामान्य जनतेच्या मोबाईल मध्ये सेव करायला लावलेत आणि अनेक सापांना जीवदान मिळू लागले आहे. अशाच प्रकारे जुना प्लॉट भागातील शिवाजीनगर परिसरात असलेल्या एका गल्लीत दुपारच्या सुमारास उंदीराच्या मागे धावणारा साप काही ग्रामस्थांच्या समोर दिसून आला, आणि धावता धावता उंदीर घराच्या भिंतीत घुसला त्यामागे हे खाद्य पकडण्यासाठी धावणारा सापही घुसला गांभीर्य म्हणून व विषाची परीक्षा नको म्हणून, काही जणांकडून मुंबई पोलीस दलात असलेला मुरलीधर जाधव हा सुट्टी निमित्त आपल्या गावी आलेला आहे, त्याला भ्रमणध्वनीवरून ही माहिती देण्यात आली. आणि तो साप पकडण्यासाठी हजर झाला.

भिंतीत साप घुसलेला जवळपास एक दोन फुट त्याची शेपटी बाहेर होती त्याला ओढले तर तो तुटणार नंतर नैसर्गिकरित्या उधळ मुंग्या लागून त्याचा मृत्यू होणार पण सर्प मित्रांनी एक धोरण अवलंबलेले आहे. त्याला जीवदान द्यायचे म्हणून या सर्पमित्राने लोखंडी सळईच्या आधारे त्या भिंतीतले दगड पोखरले व सही सलामत त्याला बाहेर काढले, तो तस्कर जातीचा साप होता. कुतूहलाने अनेक ग्रामस्थांची गर्दी झालेली. आपल्या कौशल्याने सर्पमित्र मुरलीधर जाधव व सहकार्याने त्याला पकडून त्याच्या शरीरावर माखलेली माती अलगद धुवून घेतली आणि आपल्या बॅगेत टाकले. ग्रामस्थांना पुनश्च एकदा त्याला मारू नका सर्पमित्रांना कळवा असे आव्हान करून त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यासाठी सोबत आणलेल्या बॅगेत घेऊन गेला.

Leave A Reply

Your email address will not be published.